Friday, October 7, 2016

(संवेदनशिलता नका) जाउन्द्याना बाळासाहेब !

"Use and throw"
आज बहुतांशी समाज राजकारण्यांकडे "फायद्याचा स्त्रोत" किंवा "मारले पाहिजेत साले" ह्या दोनंच दृष्टीकोनातून बघतो. आपले नेते आणि आपण एकाच समाजपुरुषाचे अवयव आहोत. अवयवास व्याधीने ग्रासले असता शक्य तोवर उपचार करून, प्रसंगी त्या भागास आराम देऊन व्याधी बरी करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण देहाशी एकरूप असलेले अवयव सतत बदलत नाही. ते sustainable देखील नाही.
तद्वत, समाजपुरुषाच्या हृदयस्थानी असलेल्या नेतृत्वाची संवेदना पुनरुज्जिवीत करण्या करता आपण उपचार केले पाहिजेत, हा विचार 'अहिंसे' इतकाच उदात्त आहे. हा विचार मांडल्या बद्दल बाळासाहेबांना धन्यवाद!